भाट्ये खाडी मुखाशी साचलेल्या गाळाचा उपसा ऑक्टोबरमध्ये होणार की नाही?
रत्नागिरी शहराजवळील भाट्येखाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या अधिकच जटील होत चालल्याने मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जूनमध्ये झालेल्या जनता दरबारात मच्छिमार संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांना ऑक्टोबर, २०२३ मध्ये गाळ उपसा करण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्र्यांच्या या आश्वासन पूर्तीकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाट्ये खाडीच्या परिसरातील राजिवडा, कर्ला, जुवे, भाट्ये आणि फणसोप येथील मच्छिमारांना समुद्रात जाण्यासाठी मांडवी बंदराचे मुख हा एकमेव मार्ग आहे. भाट्येखाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरासह संपूर्ण खाडी परिसर गाळाने भरला आहे. त्यामुळे मच्छिमारांना भविष्याची चिंता सतावत आहे. हा गाळ उपसा झाल्यास मच्छिमारांची समस्या दूर होणार आहे. हा गाळ उपशाबाबत मच्छिमारांनी अनेकदा शासनाला लेखी निवेदन दिलेली आहेत. तरीही शासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेता त्याकडे कायम दुर्लक्ष केले. www.konkantoday.com