राजापूर न.प. कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन मागे
राजापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आलेल्या बैलाला हाकलणार्या नगर परिषद कर्मचार्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणार्या संबंधिताने दिलगिरी व्यक्त केल्याने नगर परिषद कर्मचारी संघाने पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील सुचनेनुसार तसेच संंबंधित व्यक्तीने सदर कृती अनावधानाने झालेली असून त्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्याने संघटनेचे समाधान झालेले असून न.प. कमंचारी संघाने कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. यापुढे अशी घटना घडल्यास कडक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अस्लिम नाईक यांनी दिला आहे.
www.konkantoday.com