दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळले


दादर इथल्या महात्मा गांधी जलतरण तलावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पिल्लू येथे कसे आले?यावर काय कार्यवाही होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात अडीच फूट मगरीचे पिल्लू आढळले आहे. महानगरपालिकेच्या या जलतरण तलावाच्या बाजूला खाजगी प्राणी संग्रहालय आहे इथून ही मगर जलतरण तलावात आली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी ताब्यात घेतले पाहिजेत तसेच हे अनधिकृत प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

लहान मुलं नागरिक सगळे या ठिकाणी पोहायला येत असतात एखाद्याच्या जीविताशी आल्यानंतर याला जबाबदार कोण ? या जलतरण तलावाच्या बाजूला अनधिकृत खाजगी प्राणी संग्रहालय आहे ते बंद केलं पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आज पहाटे 5.30 च्या सुमारास दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button