तीन-तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर; राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा


नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे.*
तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यावरून प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्याचा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले आहे की, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?, सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये, पण महाराष्ट्राचं काय?… दुर्दैव असं की, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button