कोकण मार्गावर तिसर्या दिवशीही गाड्यांचा लेटमार्क
मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली हद्दीत मालगाडीला झालेल्या अपघातामुळे शनिवारी रात्रीपासून खोळंबलेली वाहतूक तब्बल २८ तासानंतर रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत झाल्याने कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. रेल्वेची वाहतूक सुरू झाली असली तरी तिसर्या दिवशीही गाड्यांचा लेटमार्क कायमच राहिला. सोमवारीही कोकण रेल्वेच्या आणखी ६ रेल्वेगाड्याही विलंबाने धावल्याने प्रवासी खोळंबले. मडगावला जाणारी मांडवी एक्स्प्रेसही ७ तास उशिराने रवाना झाली.
www.konkantoday.com