केंद्रीय नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री दादा इदाते यांची स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट

0
49

पद्मश्री दादा ईदाते यांनी आज स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या कामकाजाची पहाणी केली व ॲड.दीपक पटवर्धन यांच्याकडून माहिती घेतली.
स्वरूपानंद पतसंस्थेची उत्तम वसुली, लेखापरीक्षणातील सातत्यपूर्ण “अ” वर्ग यातून संस्थेचा स्वच्छ कारभार प्रतित होतो. संस्थेवर जनसामान्यांचा विश्वास दृढ झाला आहे. १७ शाखांच्या माध्यमातून चाललेले काम सहकार क्षेत्राला बळकटी देणारे आहे असे सांगत मा. दादा ईदाते यांनी संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांचे सहकार क्षेत्रातील उत्तम कामकाजाबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पद्मश्री दादा ईदाते यांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केला. याप्रसंगी राजापूर बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक श्री.जयंत अभ्यंकर, श्री.राजेश आयरे, स्वरूपानंद पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.मोहन बापट, ॲड.चंदगडकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here