राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दलमाजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांचा सत्कार
रत्नागिरी,: कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांची यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री राम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या वतीने करण्यात आला. कट्टाचे मुख्य संयोजक अण्णा लिमये, श्रीराम मंदिर संस्थेचे विश्वस्त नित्यानंद दळवी आणि कोषाध्यक्ष संतोष रेडीज यांनी डॉ. कद्रेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या वेळी संघाचे सचिव सुरेंद्र घुडे, निवृत्त माहिती अधिकारी प्रभाकर कासेकर, कलाकार अनुया बाम, एसटीचे निवृत्त आगार व्यवस्थापक दिलीप साळवी, रमाकांत पांचाळ यांनीही डॉ. कद्रेकर यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. कद्रेकर यांना हा पुरस्कार ८ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई सेंटरच्या मुख्य सभागृहात सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या रत्नागिरी येथील कामगार कल्याण केंद्राच्या संचालिका संस्कृती शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य या विषयावर चर्चासत्र घडवून आणले. या चर्चासत्रात सरकारी वकील शबाना वस्ता यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठांना दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. लायन्स क्लबच्या अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी ज्येष्ठांसाठी नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदूपानवलकर यांनी ज्येष्ठांसाठी नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासंबंधी उपलब्ध सुविधांची माहिती दिली. सामाजिक न्याय विभागाचे उमेश अष्टुरे यांनी समाजकल्याण योजनांची माहिती दिली. कामगार कल्याण केंद्र आणि लायन्स आय रुग्णालयातर्फे ही डॉ. कद्रेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल डॉ. कद्रेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुरेंद्र घुडे यांनी आभार मानले.
www.konkantoday.com