भर पावसातही रत्नागिरीतील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ,नगर परिषदेच्या प्रयत्नानंतरही नवीन नवीन विघ्न सुरू
भर पावसातही रत्नागिरीतील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे शाळेतील नवीन जॅकवेल मधून पाणी सुरू करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले असले तरी शहराला उद्या पाणीपुरवठा केला जाईल हे आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता कमी होत आहे
त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी आणखी किती दिवस थांबावे लागेल याचा अंदाज अद्यापही येत नाही शनिवारी नवी जॅक वेल सुरु करण्यात आली त्यानंतर पाण्याची समस्या मिटून सर्व काही सुरळीत होईल असे सर्वच रत्नागिरीकरांना वाटत होते. मात्र या केलेल्या कामात अनेक बिघाड निर्माण होत असल्याने जॅक वेल मधून पाणी ओढणारी मोटार थांबवावी लागत आहे. शनिवार पासून सुमारे तीन वेळा अशा पद्धतीने बिघाड झाल्याने अजूनही साळवी स्टॉप येथील टाक्यांची लेव्हल म्हणावी तशी झाली नाही. त्यात आज एका पंपाचे प्लंबिंग सुटल्याने पाण्याचे फवारे सुटून पाणी वाया गेले आता त्याच्या दुरुस्तीचे काम नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आले आहे
www.konkantoday.com