कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या प्रॅक्टिस रन ला आज लाल बहाद्दूर शास्त्री जयंती आणि गांधी जयंती च औचित्य साधून सुरुवात


सुवर्णसूर्य फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या प्रॅक्टिस रन ला आज लाल बहाद्दूर शास्त्री जयंती आणि गांधी जयंती च औचित्य साधून सुरुवात करण्यात आली.वय वर्ष १० ते वय वर्ष ६७ या वयोगटातील रत्नागिरीकर उत्साहाने या प्रॅक्टिस रन मध्ये सहभागी झाले. गृहिणी, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल, शिक्षक, शेतकरी अशा विविध कार्यक्षेत्रातले रत्नागिरीकर आज सकाळी थिबा पॉईंट इथे जमले. वॉर्मअप सेशन झाल्यावर २ किलोमीटर, ४ किलोमीटर आणि ६ किलोमीटर च्या प्रॅक्टिस रन घेण्यात आला. त्यातल्या तांत्रिक गोष्टी ऍथलेटिक्स असोसिएशन च्या संदीप जी तावडे यांनी समजावल्या. सातारा हिल हाल्फ मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर कलकुटगी यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले.

सुवर्णसूर्य फाऊंडेशन चे संचालक आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चे ऍक्टिव्ह मेम्बर असलेले प्रसाद देवस्थळी यांनी वॉर्मअप सेशन घेतले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या बॉबी सावंत, श्रद्धा रहाटे, विनायक पावसकर यांनी रनर्स ना मेंटरींग केले. राकेश होरांबे, योगेश मोरे यांनी फोटोग्राफी केली , निलेश शाह आणि दर्शन जाधव यांनी सायकल वरून रूट सपोर्ट दिला, हॉटेल मथुरा च्या माध्यमातून हायड्रेशन सपोर्ट ठेवण्यात आला होता. डॉक्टर नितीन सनगर यांनी सर्वांचे कुल डाऊन सेशन घेतले मैत्री ग्रुप च्या सुहास ठाकूरदेसाई तसेच शुभम शिवलकर यांनी तांत्रिक सहाय्य केले. आज प्रॅक्टिस रन साठी आलेल्या सर्वानी गुडविल अम्बॅसेडर बनून जास्तीत जास्त रत्नागिरीकराना धावनगरी रत्नागिरी मोहिमेचा भाग बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता थिबा पॅलेस येथून आयोजित करण्यात आलेल्या पुढच्या प्रॅक्टिस रन साठी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोकण कोस्टल मॅरेथॉन टीम कडून करण्यात आले .रजिस्ट्रेशन तसेच अधिक माहितीसाठी ९१५१५५१५४७ हा संपर्क क्रमांक सर्वाना देण्यात आला .राष्ट्रगीताने या प्रॅक्टिस रन ची सांगता झाली .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button