स्वच्छता हिच सेवा : एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न


(खंडाळा, रत्नागिरी:
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छता अभियान राबविताना स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याबाबत व हा कार्यक्रम अखंडपणे चालवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आणि प्रत्येकाने स्वच्छतादूत म्हणून पुढे यावे व घर वाडी वस्ती पर्यायाने संपूर्ण देश स्वच्छ करावा असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने सरपंच सतीश थुळ यांनी केले.
तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रा. पं. सदस्य अरुण मोर्ये म्हणाले की, कचऱ्याच्या स्वच्छतेसोबतच मनाला घाण लागू नये म्हणून मनातील कचरा, समज गैरसमज, हेवेदावे विसरून मन स्वच्छ करावे जेणेकरून अंतर्बाह्य स्वच्छता राहून आरोग्य व सामाजिक संतुलन अबाधित राहील.

ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी आयोजित “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत “एक तास स्वच्छतेसाठी” हा उपक्रम १ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता.घर व परिसर स्वच्छता, गाव-वाडी-वस्ती स्वच्छता करतानाच स्वच्छता जनजागृती करण्याबाबत शपथ घेण्यात आली.
यावेळी सरपंच श्री. सतीश थुळ, उपसरपंच चद्रकात मालप, ग्रा. प. सदस्य अरुण मोर्ये, समिक्षा घाटे, निकीता शिगवण, ममता बडबे, ग्रामसचिव एस. एस. कुलये, माजी सदस्य उदय महाकाळ, मुख्याध्यापक पालयेसर, ग्रामसंघाचे पदाधिकारी, अगणवाडी सेविका चित्रा बैकर, मृणाली महाकाल, आशासेविका खापले, बचतगटाच्या crp संगीता मोर्ये, धनश्री कदम, कृषिसखी व विविध मंडळाचे प्रतिनिधी तसेच नागरिक व ग्रा.प कर्मचारी उपस्थित होते.
ग्रा.प. सत्कोंडीच्या कार्यालयातून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
पुढील १५ दिवसात स्वच्छता पंधरवड्यात आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तिन्ही महसूल गावातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button