मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल आता महाग
मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल आता महाग झाले आहेत. या टोल दराच्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार पुन्हा एकदा वाढला आहे.मुंबईत प्रवेश करणाऱ्यांना आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांच्या खिशावर हा भार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
टोलवाढीची घोषणा आधीच झालेली आहे. आजपासून त्याची अमलबजावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ आजपासून (१ ऑक्टोबर) लागू होत आहे. आगामी तीन वर्षांसाठी ही वाढीव किंमत असणार आहे.
टोल व्यवस्थापनाचे कंत्राट देत असतानाच दर ३ वर्षानंतर टोलवाढ होणार असल्याचा करार आहे. त्यानुसार ही नियमीत दरवाढ झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र रस्त्यांवरील सुविधांचा अभाव आहे, त्यातच केलेली टोलवाढ यामुळे काहींनी संताप व्यक्त केला आहे.ऐरोली, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यांवर ही टोल वाढ होणार आहे.
www.konkantoday.com