भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिळ धरण जॅकवेलला दिली भेट.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिळ धरणावर बांधण्यात आलेल्या जॅकवेल पंप हाऊसला भेट दिली. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळधरण या ठिकाणी जॅकवेल कोसळल्याने रत्नागिरी शहरवासी यांचे पाण्याचे हाल होत आहेत. यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळाले.
आज पासून पंपिंगला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज शिळ धरण जॅकवेलला दुसऱ्यांदा भेट दिली. आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. जॅकवेलच्या ठिकाणी अवनी कंपनीचे व्यवस्थापक, व कर्मचारी तेथे उपस्थित होते. तेथील पंपिंग व इतर कामाची माहिती घेण्यात आली. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे पदाधिकारी तेथे भेट देण्यासाठी गेले होते. या ठिकाणी भेट दिल्यावर शहराध्यक्ष राजन फाळके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की शहरवासीयांना लवकरात लवकर पाणीपुरवठा व्हावा यासाठी भाजपाकडून पाठपुरावा केला जात आहे, जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत भाजपाच्या वतीने मोफत पाणी देखील पुरवले जाणार आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या सह विक्रम जैन, संतोष बोरकर, नितीन गांगण,शैलेश बेर्डे, प्रवीण देसाई, निलेश आखाडे, आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com