
गणेश भक्तांकडून श्री रत्नागिरी राजा चरणी यावर्षी दानपेटी मध्ये १,६०,७००/- रुपयांचे दान….
डॉलर्स, सेंट आदी परकीय चलनासह सोन्याच्या दुर्वा, चांदीच्या विविध वस्तू यांचाही समावेश….!
=================_
तमाम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा चा उत्सव अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष नाम. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी सुध्दा उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. राजाची विसर्जन मिरवणूक सुध्दा अतिशय दिमाखात आणि शिस्तबद्ध पार पडली.
लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मारूती मंदिर ते मांडवी मार्गावर दुतर्फा भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
मंडळाच्या रिवाजा प्रमाणे दर वर्षी विसर्जनाच्या दुसरे दिवशी दानपेटी उघडून दानपेटी मधील रक्कमेचे हिशोब पूर्ण केले जातात. त्यानुसार शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दानपेटी उघडून सर्व रक्कम मोजून हिशोब पूर्ण करण्यात आले.
यावर्षी गणेश भक्तांकडून श्री रत्नागिरी राजा चरणी दानपेटी मध्ये १,६०,७००/- रुपये रोख स्वरूपात जमा झाले.
तसेच डॉलर्स, सेंट आदी परकीय चलनासह सोन्याच्या दुर्वा, चांदीची गणेश मूर्ती आणि विविध चांदीच्या वस्तू प्राप्त झाल्या आहेत.
www.konkantoday.com