रत्नागिरी जिल्ह्यात गुरांना ‘लम्पीस्कीन’ ची लागण होण्याचा धोका वाढला


रत्नागिरी जिल्ह्यात गुरांना ‘लम्पीस्कीन’ ची लागण होण्याचा धोका गेल्या दोन वर्षात वाढलेला दिसून येतो. गतवर्षी २०२२ मध्ये ३ हजार ५०० जनावरांना लागण होऊन त्यापैकी ४२९ जनावरांचा मृत्यू झाला होता. पण यावर्षीही गेल्या ४ महिन्यात१ हजार ७५६ जनावरांना लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत १२२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गुरांवरील ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पशुधनाला विळखा अधिक घट्ट होताना असल्याने राज्यभरातील पशुपालक या आजारामुळे चिंतेत पडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही हे संकट गेल्या दोन वर्षांपासून उभे ठाकलेले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाळीव गुरांसोबतच मोकाट असलेल्या गुरांनाही लम्पीची बाधा झाल्याची बाब प्रकर्षाने समोर आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पशुसवंर्धन विभामार्गात केलेल्या सर्वेक्षणात गतवर्षी ३ हजार ५०० जनावरांना लागण झाली होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button