
दापोली तालुक्यातील वाकवली-नवानगर येथून तरूणीचे अपहरण झाल्याची फिर्याद
दापोली तालुक्यातील वाकवली नवानगर येथून अल्पवयीन तरूणीचे अपहरण झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २३ ऑक्टोबर सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली पोलीस स्थानकात याची फिर्याद देण्यात आली आहे.
२२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २३ ऑक्टोबर सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नवानगर येथील घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. ती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. म्हणून त्यांनी दापोली पोलीस स्थानकात सदर अल्पवयीन तरूणीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम ३६३ प्रमाणे अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.




