
सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या प्रॅक्टिस रन ची सुरुवात २ ऑक्टोबर पासून
नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ७ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी होणार धावनगरी
दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी संपूर्ण जगभरातले धावपटू रत्नागिरी मध्ये येऊन धावले पाहिजेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन च्या सहकार्याने सुवर्णसूर्य फाउंडेशन ने रविवार दिनांक ७ जानेवारो २०२४ रोजी कोकण कोस्टल मॅरेथॉन चे आयोजन केले आहे. त्यादिवशी रत्नागिरीला धावनगरी बनवण्याच्या उद्देशाने रजिस्ट्रेशन ला सुरुवात झाली आहे आणि कोकणातून तसेच कोकणाबाहेरून प्रचंड प्रतिसाद या मॅरेथॉन च्या रजिस्ट्रेशन ला मिळत आहे.
या मॅरेथॉन साठीच्या प्रॅक्टिस रन ची सुरुवात रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन चे सेक्रेटरी संदीप जी तावडे यांच्या उपस्थितीत आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या सहाय्याने गांधी जयंती च्या सुमुहूर्तावर सुवर्णसूर्य फाउंडेशन करत आहे. यानंतर प्रत्येक रविवारी अशा प्रॅक्टिस रन आयोजित केल्या जातील.
ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे किंवा ज्यांची रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी मोफत असणारी ही प्रॅक्टिस रन थिबा पॅलेस गेट ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:१५ वाजल्यापासून सकाळी ७:३० वाजेपर्यंत असेल.
तज्ज्ञ व्यक्तींच्या निरीक्षणाखाली या प्रॅक्टिस रन असतील. तसेच सर्व धावकांना प्रॅक्टिस प्रोग्रॅम देखील देण्यात येणार आहे.रत्नागिरीला धावनागरी बनवण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचा जानेवारीपर्यंत धावण्याचा व्यवस्थित सराव व्हावा,धावण्यातले बारकावे त्यांच्या लक्षात यावेत आणि धावण्याची आवड सर्वांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने ७ जानेवारी २०२४ च्या जवळपास १०० दिवस आधीपासूनच धावनागरी रत्नागिरी मोहिमेची तयारी रत्नागिरीकरांकडून सुरु झाली आहे.
तरी जास्तीजास्त रत्नागिरीकरानी अर्धा लिटर पाण्याची बाटली, चिक्की/केळ तसेच नॅपकिन घेऊन या प्रॅक्टिस रन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशन , रत्नागिरी ऍथलेटिक्स असोसिएशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ९१५१५५१५४७
www.konkantoday.com