
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळ विक्रेत्या टेम्पो रिक्षाचा अपघात, एकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड नजीक फळ विक्रेत्या टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात शनिवारी पहाटे ५ ते ६ वा. च्या सुमारास झाला असावा असा अंदाज आहे.सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. नेमका अपघात कसा झाला हे समजू शकले नसले तरी टेम्पो पलटी होऊन दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.
www.konkantoday.com