
शीळ जॅक वेल कार्यन्वीत करण्यात यश, सोमवार पासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता
गेले काही दिवस रत्नागिरी शहरावर निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होणार आहे
शीळ धरणाजवळील जॅक वेल कोसळल्यावर रत्नागिरी शहरासमोर मोठे पाणी संकट उभे राहिले होते. पण यातून आता मार्ग काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसी कडून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच जॅकवेल चे काम तातडीने सुरू आदेश दिले होते मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी अत्यंत जलद गतीने नियोजन करित नवी जॅक वेल सुरु केली आहे. तसेच हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी आवश्यक असलेला पंप सुरू करण्यात आला आहे त्यामुळे टाक्यांची पाण्याची लेव्हल झाल्यानंतर सोमवारपासून शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा होईल असा अंदाज आहे
www.konkantoday.com