राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेचा ३ ऑक्टोंबर २०२३ पासुन कामबंद आंदोलनाचा इशारा
राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेने ३ ऑक्टोंबर २०२३ पासुन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे .याबबतचे निवेदन नगर परिषद कर्मचारी संघाने प्रशासक वैशाली माने व मुख्याधिकारी प्रशांत भोसले याना दिले आहे .
शहरातील काही राजकारणी लोकांचे समर्थक तसेच काही नागरीक कर्मचारी कामावर असताना त्यांना दमदाटी करणे, त्यांचे अंगावर मारणेसाठी धाऊन जाणे अशा तक्रारी नगर परिषद कर्मचारी संघाकडे आल्या असल्याची बाब स्पष्ट करत संघाने राजापूर नगर परिषद कर्मचारी यांना काम करणे खुप कठिण होऊन बसलेले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे .
दिनांक २८/०९/२०२३ रोजी सायंकाळी ७.२४ मीनिटांनी आमचे सफाई मुकादम जवाहर चौक येथे कामावर असताना श्री गणेश मुर्ती विसर्जनचे मिरवणूकीमध्ये एक बैल घुसत असताना सदर बैलाला श्री. राजन जाधव हे बाजूला करीत असताना एका अज्ञाताने तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी यांची लाठी खेचून आमच्या कर्मचा-याच्या अंगावर मारावयास धाऊन गेले. आमचा कर्मचारी कर्तव्याचे पालन करीत असताना तसेच कोणतीही चुक नसताना आमच्या कर्मचा-यावर धाऊन जाणे हे उचित नाही. अशामुळे आमच्या कर्मचा-यांचे मनोधर्ये खच्चीकरण होत असून आमच्या कर्मचा-यांच्या जीवीतास धोका उदभवतो असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे .
www.konkantoday.com