रत्नागिरी शहरातील जुना माळनाका येथील व्यायामशाळेच्या जागेत ’व्यापारी संकुल’ होणार.

रत्नागिरी नगर परिषदेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात अनेक उपकम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून माळनाका येथील जुन्या व्यायामशाळेच्या जागेवर नवीन व्यायामशाळेसह आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने दिलेल्या जागा मोकळ्या करण्याचे आदेश देण्यात आले असून, संबंधित  व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नगर परिषदेची आर्थिक स्थिती पाहता, नगर परिषदेला दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांमधून सुमारे १५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, विविध विकासकामांसाठी निधीचा वाटा दिल्याने नगर परिषदेची आर्थिक स्थिती काहीसी डळमळीत बनली आहे.

अशा परिस्थितीत नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी नगर परिषदेने पावले उचलली आहेत. तारांगण, मल्टीमिडीया शो आणि पेठ किल्ल्यातील शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांमधून उत्पन्न सुरू झाले आहे. आता माळनाका येथील जागेच्या विकासातून भाड्याच्या स्वरूपात महसूल मिळण्यासाठी पाउल उचलण्यात आले आहे. माळनाका येथील जागेचा विकास पूर्ण झाल्यानंतर व्यापारी संकुलातील दुकाने आणि इतर सुविधांच्या भाड्यामधून नगर परिषदेला नियमित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा प्रकल्प रत्नागिरीच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासह  स्थानिक नागरिकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देणास ठरणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button