
रमजान सणावरही कोरोनाचे सावट
असंख्य मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान मासाला प्रारंभ झाला. यंदाही रमजानवर कोरोना विषाणूचे संकट कायम असल्याने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन रद्द करावे लागणार आहे.
धार्मिक स्थळी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरातच नमाज पठण करण्याच्या सूचना राज्य शासनामार्फत देण्यात आल्या आहेत. रमजानच्या कालावधीत मशिदीसह सार्वजनिक ठिकाणी जाऊन मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करावे, असे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
www.konkantoday.com