धामणी येथील हॉटेल श्रद्धाचे मालक प्रवीणशेठ वाकणकर यांचे निधन
संगमेश्वर- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील प्रसिद्ध हॉटेल श्रद्धाचे मालक, भारतीय जनता पक्षाचे जूने आणि ज्येष्ठ नेते, धामणी गावचे माजी सरपंच व समाजसेवक प्रविण नारायण वाकणकर ( वय 58) यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 9 वाजता धामणी येथील राहत्या घरातून निघणार आहे.
दत्तभक्त असलेले प्रविण शेठ अतिशय संयमी व शांत स्वभाव, हसतमुख व्यक्तिमत्व होते.
www.konkantoday.com