
ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभुमीवर अचानक नार्वेकरांचा परदेश दौरा रद्द
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू, ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभुमीवर अचानक नार्वेकरांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहेदौरा रद्द करण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाहीय.
आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत रोडमॅप सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार, विधानसभा अध्यक्षांच्या वतीन सर्वोच्च न्यायालयात रोडमॅप सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या रोडमॅपवर आक्षेप घेत थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. अपात्रता मुद्दा सोडून इतर विषयात अध्यक्ष वेळ घालवत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचा आहे
www.konkantoday.com