कोकण रेल्वे मार्गावर ६ एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकात पोहचण्याच्या वेळेत बदल


कोकण मार्गावरून धावणार्‍या ६ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या सीएसएमटी मुंबईसह लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहचण्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले आहे.
क्र. १२०५२ मडगांव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस १ ऑक्टोबरपासून रात्री ११.३० ऐवजी रात्री ११.५५ वा. सीएसए:टी स्थानकात पोहोचेल. क्र.  २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस रात्री  २३.५५ ऐवजी रात्री १२.२० वा. सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. क्र. १६३४६ तिरूअनंतपुरम एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस १ ऑक्टोबरपासून सायं. ४.४६ ऐवजी सायं. ५ वा. ५ मिनिटांनी एलटीटी स्थानकात पोहोचेल.
क्र. १२२२४ एर्नाकुलम एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ ऑक्टोबरपासून सायं. ६.१५ ऐवजी सायं. ६.५० वा. एलटीटी स्थानकात पोहोचेल. क्र. १११०० मडगांव -एलटीटी एक्स्प्रेस २ ऑक्टोबरपासून एलटीटी स्थानकात रात्री ११.२५ ऐवजी ११.३५ वा. पोहचेल. क्र.  २२११६ करमाळी एलटीटी वातानुकुलीत सुपरफास्ट एक्स्प्रेस ५ पासून रात्री ११.२५ ऐवजी रात्री ११.३५ वाजता एलटीटी स्थानकात पोहचेल. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button