अरबी समुद्रात चक्रावात वार्याची प्रणाली विकसितझाल्याने कोकण किनारपट्टीवर सर्वत्र पुन्हा पावसाचे दाट सावट
अरबी समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये एक चक्रावात वार्याची प्रणाली विकसितझाल्याने कोकण किनारपट्टीवर सर्वत्र पुन्हा पावसाचे दाट सावट दाटलेले आहे. सध्या त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. पुढील २४ तासात त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या गडकडाटासह पावसाचा इशारा दिला. यामध्ये प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकणातील रायगड, रत्नागिर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऍरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकणात ३० सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com