संगमेश्वरजवळच्या कडवई येथील हार्डवेअर दुकानामध्ये काम करणार्या कामगाराला चोरीप्रकरणी अटक
संगमेश्वरजवळच्या कडवई येथील हार्डवेअर दुकानामध्ये काम करणार्या कामगाराला चोरीप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. कडवईमधील हरिओम ट्रेडर्स हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानात २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान एकूण ४९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात भरत साळवी यांनी दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कांबळे, आव्हाड, मनवळ, कामेरकर यांनी तपास केला. दुकानामधील कामगार शुभम अशोक सावंत (रा. तांबेडी) याला चोरीप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पोलिसानी अर्धा माल जप्त केला. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com