रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी विभागातील खालचे अधिकारी व कर्मचारी तणावाखाली ,शहरात अनेक भागात पाणी येत नसल्याने कर्मचारी होत आहेत टारगेट
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाची जॅकवेल कोसळल्याने रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा केले काही दिवस ठप्प झाला होता त्यातून नगरपरिषद प्रशासन व जिल्हा प्रशासनाने तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असला तरी शहरातील अनेक भागात चार चार दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांच्या संताप निर्माण झाला होता पाण्याची मागणी आणि टँकरद्वारे होणारा पुरवठा याच्यात कुठेच मेळ बसत नसल्याने नागरिकांच्या रोषाला नगर परिषदेचे पाणी विभागातील खालचे अधिकारी व कर्मचाऱ्यां यांना नागरिकांच्या तोंड द्यावे लागले लागले त्यामुळे गेले काही दिवस हे कर्मचारी तणावाखाली असून त्यातील एका अधिकाऱ्याला तर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे ऐन सणाच्या काळात पाणी येत नसल्याने नागरिकांनी एक तर नगरपरिषद कार्यालय गाठून पाणी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली तर काहींनी फोन करून पाणी कर्मचाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला मुळात या प्रश्नाकडे पाणी विभागातील पाणी कर्मचाऱ्यांकडे कोणताही उपाय नव्हता कारण असलेले पाणी चे वाटप करणे हे या विभागाचे काम होते मात्र शहरातील नागरिकांवर ही वेळ येण्यास जबाबदार असलेले पूर्वीचे सत्ताधारी प्रशासन कंत्राटदार मात्र यात नाम निराळे राहिले होते सततच्या नागरिकांच्या संतापाला तोंड द्यावे लागल्याने पाणी विभागातील कर्मचारी व अधिकारी तणावाखाली आले आहेत सततचा तणाव वाढल्याने एका अधिकाऱ्याला तर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आता नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा रविवारपासून सुरळीत चालू होण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी मुळात ही वेळ कोणामुळे आली याचा विचार नागरिकांनी करणे गरजेचे आहे
www.konkantoday.com