महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांचे प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्रातील रखडलेली कामे लवकरच मार्गी लागणार
महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांचे प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्रातील रखडलेली कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. यासाठी आमदार भरत गोगावले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.कारखानदारांच्या शिष्टमंडळासमवेत उद्योग मंत्रालयात सर्व संबंधित खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत रखडलेली कामे मार्गी लावण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये लहान-मोठे दीडशे कारखाने सुरू आहेत. महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या पहिल्या आयएमएस प्रमाणित सीईटीपीच्या उत्कृष्ट पर्यावरपूरक कामगिरीमुळे महाड औद्योगिक क्षेत्रात बरेच नवीन उद्योग येत आहेत. मात्र त्याकरीता औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित समस्यांबाबत व पायाभूत सुविधांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कारखानदारांनी केली होती.
www.konkantoday.com