
दाभोळमध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
दापोली तालुक्यातील दाभोळ हे पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असणारे गाव सध्या चिखलाने माखले आहे. यामुळे लोकांना रस्त्यावरून चालणेही दुरापास्त झाल्याने गुरूवारच्या गणपती विसर्जन मिरवणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
दाभोळमधील रस्त्यावर गेले कित्येक महिने खड्ड्यांचे साम्राज्य होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून हे खड्डे डबर व मातीने भरण्यात आले. यानंतर आलेल्या पावसाने व सततच्या रहदारीने सर्व रस्त्यांवर डबर पसरून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचार्यांना त्रासाला सामोरे जावे लागत अहे. www.konkantoday.com