काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामास्त्रानंतर प्रदेश काँग्रेस नरमले, समीर वंजारी यांच्या नियुक्तीला स्थगिती
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष ईशाद शेख यांना तडकाफडकी हटवून समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली खरी मात्र आता हीच नियुक्ती वादात सापडली. यानंतर जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्यानंतर प्रदेश काँग्रेसने वंजारी यांच्या निवडीलाच स्थगिती दिली असून ईशाद शेख यांना जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नेमले आहेयाबाबतचे पत्र शुक्रवारी पाठविण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी ईशाद शेख यांची नेमणूक दीड वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र दोन दिवसापूर्वीच शेख यांना तडकाफडकी बदलून त्याच्या जागी समीर वंजारी यांची नेमणूक करण्यात आली. मात्र वंजारी यांची नियुक्ती वादात सापडली होतीदरम्यान पदाधिकाऱ्यांकडून सामुदायिक राजीनामास्त्रा नंतर प्रदेश काँग्रेसकडून यांची गंभीर दखल घेत समीर वंजारी याच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाला स्थगिती देत ईशाद शेख यांचीच नियुक्ती कायम ठेवली आहे.
www.konkantoday.com