
वातावरणातील बदलामुळे देवगड बंदरामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात व स्थानिक नौका सुरक्षिततेसाठी दाखल
अतिवृष्टी व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात शेकडो मच्छीमार नौका दाखल झाले आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यातील नौकांचा समावेश आहे.२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे देवगड बंदरामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात व स्थानिक नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाले आहेत.
www.konkantoday.com