सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईबावडा घाटात काल दुपारी दरड कोसळली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वैभववाडी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात काल दुपारी पावणे चारच्या सुमारास दरड कोसळली.जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून आज (ता. २८) ऑरेंज तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २६) सावंतवाडी, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता.
त्यानंतर काल देखील दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वैभववाडी तालुक्यात दुपारी एकनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. घाटपरिसरात पावसाचा जोर अधिक होता. मुसळधार पावसामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून दोन किलोमीटरवर दरड कोसळली.
www.konkantoday.com