सिंधुदुर्गच्या समुद्रात होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी गस्ती नौका कार्यान्वयीत
मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाकडून मच्छीमारांच्या मागणीनंतर शितल गस्ती नौका कार्यान्वित केली. स्थानिक मच्छीमारांनी पर्ससीन नौकांनी घुसखोरी करून बेकायदेशीररित्या मच्छिमारांना विरोध केल्यानंतर ही नौका तैनात करण्यात आली.यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने तात्काळ गस्ती नौका सुरु करुन बेकायदेशीर मासोमारीला आळा घालावा अशी मागणी केली आहे. जर अशा मासेमारीवर कारवाई केली नाही तर पितृ पक्षात शासनाच्या नावाने पिंडदान करण्याचा इशारा स्थानिक मच्छीमारांनी केला. या इशाऱ्यानंतर मत्स्य विभागाने गस्ती नौका २०२३- २४ करिता जिल्हा स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात भाडे तत्वावर घेण्याच्या निर्णयास मान्यता दिली. त्यानुसार आजपासून शितल ही गस्ती नौका तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित करण्याचे आदेश मत्स्य व्यवसायचे सहाय्यक आयुक्त स. अलगिरी यांनी दिले. याची प्रत मत्स्य व्यवसायचे आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त तसेच संबंधित गस्ती नौकेच्या मालकास पाठविण्यात आली. आता ही गस्ती नौका उपलब्ध झाल्यावर मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई करावी अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे.
www.konkantoday.com