मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर रत्नागिरी मनसे तर्फे जल्लोष
रत्नागिरी : दुकानांच्या पाट्या मराठी करण्याला विरोध करणाऱ्या गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच आस्थापने व दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक असल्याचा निर्णय दिल्यानंतर या मुद्यावर कायम संघर्ष करणाऱ्या मनसेतर्फे संपूर्ण राज्याभरात तसेच रत्नागिरीतही फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे जल्लोष केला.
यावेळी बोलताना मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी म्हणाले, या मुद्द्यावर मनसेतर्फे सर्वाधिक आक्रमक आंदोलन करण्यात आली तसेच असंख्य महाराष्ट्रसैनिकांना अटक, कायदेशीर कारवाई, खटले यांना सामोरे जावे लागले. म्हणून हा मनसेचाच विजय असल्याचे आम्ही मानतो अशी भावना व्यक्त केली. यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहरसचिव अजिंक्य केसरकर, महिला उपशहर अध्यक्ष शिल्पाताई कुंभार, उपशहर अध्यक्ष सिद्धेश धुळप, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिशजी खामकर,अनंत शिंदे, इम्रान नेवरेकर आदी महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.