पाणी पुरवठामध्ये पक्षीय राजकारण सुरू,पाण्यात पक्षपातीपणा केला…तर नगर परिषदेला टाळे ठोकण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा


नगरपरिषदेच्या कारभारामुळे सध्या रत्नागिरी करांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे अनेक भागात चार चार दिवस पाणी आलेले नाही मात्र आता पाण्या वाट पाहत आहे राजकारण होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे
रत्नागिरी शहरावर पाणी संकट असून जो पाणी पुरवठा होतो त्यामध्ये पक्षीय राजकारण सुरू आहे. पाण्यात पक्षपातीपणा केला, तर नगर परिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर आणि पाणी अभियंत्यांना दिला आहे.

शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून अनेक भागात चार-चार दिवस पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून शिवसेना ठाकरे गटाने नगर परिषदेवर आज बुधवारी २७ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र काही ठराविक पदाधिकारी थेट वाहनांवरून नगर परिषदेवर धडकले. तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, महिला पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केले. नगर परिषदेत आल्यानंतर मुख्याधिकारी तुषार बाबर दालनात नसल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळात मुख्याधिकारी आल्यानंतर सर्व पदाधिकारी त्यांच्या दालनात गेले. यावेळी पाणी अभियंता अविनाश भोईर व अन्य कर्मचारीसमवेत होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
ठाकरे गट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबत्ती केली. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. यावर नगर परिषदेने काय नियोजन केले? ठेकेदाराने यात दिरंगाई केली असेल तर त्यांच्यावर फाैजदारी दाखल करा. परंतु जनतेला पाण्यापासून वंचित ठेऊ नका. पाण्याच्या नियोजनासाठी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. आम्हाला का नाही बोलावले?

आजपासून प्रत्येक प्रभागात १ अशा १६ टॅंकरचे नियोजन करा. त्याची पूर्ण माहिती शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांना द्यावी. यावर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आम्ही तसे नियोजन करून तुम्हाला माहिती देतो, असे सांगितले. मात्र जर तसे झाले नाही, तर नगरपरिषदेला कुलुप ठोकू, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असा इशारा यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button