पगार न दिल्याच्या रागातून लॅपटॉप उचलून नेला
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे ऑफिसमध्ये कामाला असलेल्या तरूणाने पगाराचे पैसे दिले नसल्याच्या रागातून लॅपटॉप चोरून नेला, अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. सुधीर काशिनाथ सुनेकर (४८, रा. नाचणे, रत्नागिरी) असे लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार करणार्याचे नाव आहे.
सुधीर चुनेकर यांचे शहरातील साळवी स्टॉप येथे शेअर मार्केटचे दुकान आहे. या दुकानामध्ये जून २०२३ पासून अक्षय चौगुले कामाला होता. दरम्यान सप्टेंबर २०२३ पासून अक्षय याने आपण काम सोडले असल्याचे सुधीर चुनेकर यांना फोन करून सांगितले. तसेच आपल्या राहिलेल्या दिवसांचा पगाराची मागणी केली. मात्र समोर येवून पैसे मिळाले नसल्याचा राग मनात ठेवून अक्षय याने आपल्या दुकानातील लॅपटॉप चोरून नेला असा आरोप चुनेकर यांनी केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अक्षय याच्याविरूद्ध भादंवि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com