नाहक पर्यावरणाच्या नावाखाली बदनामी करू नका- चिपळूण लाकूड व्यापारी संघाची मागणी


चिपळूण- लाकूड व्यापाऱ्यांमुळेच अनेक नैसर्गिक घटना घडतात, असे भासवून पर्यावरणवाद्यांकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. ते याच मातीतील आहेत आणि आम्हीही भूमिपूत्र आहोत. पर्यावरणप्रेमी इतका बाऊ का करत आहेत. त्यांनी समोरासमोर बसून चर्चा करा, आम्ही कधीही तयार आहोत; परंतु आमच्यावर आरोप करू नये, असे प्रतिपादन लाकूड व्यापारी संघटनेचे सतीश मोरे यांनी केले.
शहरात मंगळवारी (ता. २६) तालुक्यातील लाकूड व्यापाऱ्यांची बैठक झाली. या वेळी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमित सावंत, कार्याध्यक्ष अनंत पवार, उपाध्यक्ष संजय थरवळ, प्रथमेश भोबस्कर, प्रितम कदम, सचिव बाबा राहाटे, खजिनदार रूपेश खांडेकर, सहसचिव विलास निकम, सहखजिनदार रिजवान माटवनकर, सल्लागार महेश शिंदे, आप्पा लाड, दिलीप सुर्वे, ओतारी, राकेश साळवी, बाळकृष्ण जाधव, रवी पालांडे, सतीश मोरे आदी उपस्थित होते. पालांडे यांनी पर्यावरणवादी आपल्याला कसा त्रास देतात याची माहिती दिली व हे प्रकार त्यांनी थांबवावे, असे सांगितले. बाळकृष्ण जाधव यांनी ही पारंपरिक वनशेती असून, शेतकरी आपल्या गरजेनुसार वृक्षतोड करतो व आपली अडचण सोडवतो. त्यावर कोणी टाच आणू नये, असे सांगितले. सतीश मोरे म्हणाले, २००८ मध्ये असाच प्रकार झाला होता. त्या वेळी आम्ही मोर्चा काढला होता. आम्ही या खोट्या तक्रारी सहन करणार नाही. आमची बदनामी करताना जुने फोटो वापरले जातात हे अयोग्य आहे. आम्ही आपल्याबरोबर समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. जे असेल ते समोरासमोर बोलू; पण नाहक पर्यावरणाच्या नावाखाली बदनामी करू नका असेही ते म्हणाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button