
दारूसाठी पैसे न दिल्याने मित्रावर कोयत्याने वार, कुवारबाव येथील घटना
रत्नागिरी नजिकच्या कुवारबाव येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरूणाने मित्रावर कोयत्याने सपासप वार केले. कुवारबाव पसिरात थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्रसाद बारसमोरील जागेत घडली. कोयत्याच्या वारामुळे रक्तबंबाळ झालेल्या तरूणाला पोलिसांच्या मदतीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
राजू महादेव दास (४०, रा. कुवारबांव रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. राजू याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पप्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार राजू हा २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी कुवारबाव येथील प्रसाद बार येथे दारू पिण्यासाठी गेला होता. ७.३० वा. राजू हा दारू पिवून बाहेर आला असता त्याचा मित्र पप्या बाहेर उभा असल्याचे त्याला दिसले. यावेळी पप्या याने राजूजवळ दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पप्याकडून पैशाची मागणी होताच तुला रोज रोज कुठून पैसे कुठून देवू. तुझ्या बापाने माझ्याकडे पैसे देवून ठेवलेले नाहीत. असे राजूने पप्याला सांगितले. राजूचे हे बोलणे ऐकून पप्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने जवळील दुकानात जावून धारदार कोयता आणला. या कोयत्याने पप्याने राजूच्या डोक्यात सपासप वार केले. पप्याचे वार वर्मी लागल्याने राजू रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले www.konkantoday.com