अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह छायाचित्र, संशयिताला जामीन
रत्नागिरी तालुक्यातील मुलीचे आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर ठेवल्याचा आरोप असलेल्या तरुणाची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. युवराज हेमंत राठोड (२०, रा. कारवांचीवाडी, मुळ जालवाद, ता. देवरहिप्पी, जि. विजापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल निंबाळर यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला. आरोपीच्यावतीने ऍड. सचिन पारकर यांनी काम पाहिले. गुन्ह्यातील माहितीनुसार संशयित युवराज राठोड याने पिडीत मुलगी अल्पवयीन होती म्हणून प्रेमसंबंध चालू ठेवले नाहीत तिच्याशी संपर्कही तोडला. मात्र त्याने पिडीत मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने इन्स्टाग्रामवर फेक आयडी काढून तिचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले, अशी तक्रार पिडीत मुलीने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केलेली होती. www.konkantoday.com