
कुस्ती स्पर्धेत शहरातील झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंचे यश.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या कुस्ती स्पर्धेत शहरातील झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंनी यश मिळविले. स्पर्धेतून हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथील शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड केली आहे. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एम. डी. पाटील, शिक्षक तानाजी गायकवाड, दीपक पाटील, अमोल मंडले, अशोक सुतार, शिक्षिका स्वप्नाली भुजबळराव, सैफुद्दीन पठाण, वसतिगृह अधिक्षक गजानन बागडी, सागर कदम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, आजीव सेवक श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, मुख्याध्यापक ए. डी. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रितम पिलणकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विजयी खेळाडूंची नावे अशीः मुली- रुद्रा अजित चव्हाण, मुले ः साईराम महिपती जाधव, वेदांत रामदास खोत, हर्ष रवी बैरागर, आर्यन रमेश चव्हाण, विकास चंद्रकांत पाटील.