सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी राजवाडा परिसरात भजनासाठी आलेल्या तरुणांच्या दुचाकी वर झाड कोसळून दोघांचा मृत्यू


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी राजवाडा परिसरात भजनासाठी आलेल्या तरुणांच्या दुचाकी वर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
मंगळवारी रात्री झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे भले मोठे भेडले माडाचे झाड थेट अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटना मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली. राहुल प्रकाश पंदारे (वय 24) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय 21, रा. गवळीवाडी) अशी या दोघांची नावे आहेत. गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या सोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला.
दोघेही मृत युवक गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ नगरपरिषद व पोलिसांना ही खबर दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा अग्निशमन बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button