
रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक , आज ठाकरे शिवसेनेतर्फे रत्नागिरी नगर परिषदेवर धडक मोर्चा
रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून भर पावसात नागरिकांना पाणी पाणी करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शहरवासीयांची परवड सुरू असल्याने या विषयावर आता विरोधी पक्ष आक्रमक झाले असून याचा जाब विचारण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आज रत्नागिरी नगर परिषदेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना सचिव व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार श्री. विनायक राऊत व शिवसेना उपनेते तथा लांजा राजापूर, संगमेश्वर चे आमदार श्री डॉ. राजन साळवी यांच्या सुचने नुसार आणि जिल्हाप्रमुख श्री.विलास चाळके व उप जिल्हाप्रमुख श्री.संजय साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री प्रमोद शेरे व तालुकाप्रमुख व माजी नगराध्यक्ष श्री प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख श्री श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण, नितीन तळेकर, महेश पत्की,व महिला उपजिल्हा संघटक सौ.संध्याताई कोसुम्बकर , शहर संघटक सौ.मनीषाताई बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी 10-30 वाजता शिवसेना संपर्क कार्यालय आठवडा बाजार येथून जमुन सध्या शहराला पाणी पुरवठा बंद असल्या बाबत नागरपालिकेवर धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक तसेच महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना, रिक्षासेना, व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com