भाविकांची रात्री उशिरानंतर गैरसोय होऊ नये म्हणून यंदा मुंबई लोकलवर १८ विशेष फेऱ्या
मुंबई : उद्या आपला लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. उद्या अनंतचतुर्थी या दिवशी मुंबईतील समुद्रीकिनारी मुंबई पश्चिम उपनगर व मध्य उपनगर या ठिकाणाहून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. यासाठी रेल्वेकडून प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. या भाविकांची रात्री उशिरानंतर गैरसोय होऊ नये म्हणून यंदा मुंबई लोकलवर १८ विशेष फेऱ्या धावणार आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.
जाणून घ्या वेळापत्रक…
(मध्य रेल्वे)
सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून 01.40 वाजता सुटून कल्याणला 3.10 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी-ठाणे स्पेशल सीएसएमटीहून 02.30 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल.
सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून 03.25 वाजता सुटेल आणि 4.55 वाजता कल्याणला पोहोचेल.
मुख्य लाइन अप विशेष:
कल्याण-सीएसएमटी स्पेशल कल्याणहून 00.05 वाजता सुटेल आणि 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 01.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 02.00 वाजता पोहोचेल.
ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 02.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 03.00 वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन – डाऊन स्पेशल :
सीएसएमटी-बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 01.30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02.35 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी- बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 02.45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03.50 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन अप विशेष:
बेलापूर – सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 01.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02.20 वाजता पोहोचेल.
बेलापूर – सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 02.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 03.05 वाजता पोहोचेल.
कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी जनतेला सुरक्षित आणि योग्य तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com