कुरधुंडा येथील हजरत जैनुद्दीन बाबांचा २४ फेब्रुवारीला उर्स*

प्रति वर्षाप्रमाणे या वर्षीही संगमेश्‍वर तालुक्यातील कुरधुंडा येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे हजरत जैनुद्दीन बाबांचा उरूस शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.मुंबई-गोवा महामार्गालगत संगमेश्‍वर-कुरधुंडा येथे असलेल्या हजरत जैनुद्दीन बाबा दर्गा येथे उरूसानिमित्तान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूस्थानचे सुप्रसिद्ध फिल्म स्टार कव्वाल रईस अनिस साबरी यांचा जंगी कार्यक्रम शनिवारी रात्री ९ वा. च्या सुमारास होणार आहे.या निमित्ताने सतत दोन दिवसांचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री संदल (गिलाफ) ची मिरवणूक गावातून निघणार आहे. २४ रोजी कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. या उर्सला हिंदू मुस्लिम भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button