पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि किरण सामंत यांच्यासहकार्यातून शहरातील विविध परिसरातील नागरिकांना २ लाख लिटर पाण्याचे वाटप


रत्नागिरी शहरातील लोकांना सध्या पाणी या विषयाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहराची जलवाहिनी असलेली शिळ धरणातील जॅकवेल काही दिवसापूर्वी पडल्याने रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. या जॅकवेल च्या नादुरुस्तीमुळे रत्नागिरी शहराला पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र यावर उपाय काढत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याला पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. त्या पद्धतीने रत्नागिरी शहराला एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू झाला होता. प्रत्येक वॉर्ड मध्ये दोन दिवस आड करून पाणी दिले जात होते. गणपती सणामध्ये सदरील पाणी अपुरे पडत असल्याने पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि किरण सामंत यांनी एमआयडीसीच्या पाणी नियोजनावर अवलंबून न राहता त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने वैयक्तिकरित्या खाजगी टँकरच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील लोकांसाठी सुमारे दोन लाख लिटर पाणी देण्याचे काम पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि त्यांचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
प्रत्येक संकटकाळात उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारीही मदतीसाठी पुढे असतात रत्नागिरीवर जॅकवेल कोसळल्यानंतर पाण्याचे मोठे संकट आले असताना रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत हे याकडे लक्ष देऊन आहेत.
या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी उदय सामंत आणि किरण सामंत यांचे सहकार्यातून तसेच शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवण्याचे काम केले जात आहे. यासाठी रत्नागिरी शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक आणि स्वतः सर्वत्र कार्यरत आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे त्याच्या जोडीला आता शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन शहरातील लोकांसाठी दोन लाख लिटर पाण्याची व्यवस्था करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा आज पूर्ण करण्यात आले आहे.

यासाठी ना.उदयजी सामंत आणि किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक,लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button