पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनेनुसारअनंत चतुदर्शी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडून गुरुवारी स्थानिक सुट्टी
*रत्नागिरी, : पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनेनुसार उद्या गुरूवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुदर्शी निमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
दरवर्षी अनंत चतुर्दशीसाठी स्थानिक सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर केली जाते. मात्र, यावर्षी उद्या गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी जाहीर होती. मात्र, त्यात बदल करुन उद्याऐवजी शुक्रवार दिनांक २९ रोजी सुट्टी जाहीर केल्याची अधिसूचना आज शासनाने जाहीर केली. त्यामुळे उद्या अनंत चतुर्दशीला सुट्टी नव्हती.
उद्याच्या सुट्टीसाठी कर्मचारी/नागरिक यांनी पालकमंत्री श्री. सामंत व जिल्हाधिकारी श्री. सिंह यांना विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांच्याशी चर्चा करुन सूचना केली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी उद्या गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीदशीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
www.konkantoday.com