
दिवा-रत्नागिरी मेमू ट्रेनची सेवा २ ऑक्टोबरपर्यंत कायम
गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मेमू स्पेशल रेल्वे गाडीच्या फेर्या २ ऑक्टोबरर्पंत सुरू राहणार आहेत. संपूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईकडे जाताना व मुंबईहून रत्नागिरीकडे येताना कन्फर्म तिकिट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
नियमित गाड्यांसह कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल झाले. मध्यरेल्वेने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या शेकडो फेर्या जाहीर केल्या. मुंबईहून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत गणेशोत्सवासाठी प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालविण्यात येत आहे. www.konkantoday.com