ट्रेलर चालकाची दारूच्या नशेत दुचाकीला जोरदार धडक,रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील तरुणाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचा सत्र संपायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलर चालकाने दारूच्या नशेत समोर दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील संदेश सदानंद घाणेकर (वय ३२)या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आहे.
गणेशोत्सवकरून तो पुन्हा मुंबईकडे दुचाकी वरून चालला होता. मुंबई वडाळा गणेश नगर येथे राहणारा तरुण आहे. संदेश हा नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होता. कानसई गावच्या हद्दीत हॉटेल नवरत्न जवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालक दारूच्या नशेत सुकेळी कडून नागोठणेकडे भरधाव वेगात निघाला होता. याप्रकरणी मध्य प्रदेशातील ओमप्रकाश रामलाल पटेल (वय ३६) या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.संदेश सदानंद घाणेकर याचं दोन वर्षांपूर्वी नुकतेच लग्न झालं होतं तो नोकरी निमित्त मुंबई वडाळा गणेश नगर येथे वास्तव्यास होता. आई वडील पत्नी या सगळ्यांना तो गावी ठेवून दुचाकीवरून मुंबईकडे निघाला होता. पण दुर्दैवाने संदेश चा प्रवास अखेरचा ठरला.
www.konkantoday.com