जॅकवेल कोसळली शीळ धरणावरची आणि कूवारबाव मध्ये सोमवारपासून नळाला पाणीच नाही, ग्रामस्थ हवालदिल
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या शीळ धरणावरील जॅक वेल कोसळली आणि रत्नागिरीचा पाणीपुरवठा ठप्प झाला. मात्र त्याची जबरदस्त झळ आता कूवारबाव ग्रामपंचायतीला बसत आहे. कुवारबावसह शहर परिसरातील सहा ग्राम पंचायतींना नळ पाणी योजनेसाठी एम आय डी सी कडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र रत्नागिरी शहराची पाणी समस्या सोडविण्यासाठी एम आय डी सी कडून या ग्रामपंचायतीना हरचेरी धरणातून पुरविले जाणारे पाणी रत्नागिरी शहराकडे वळविण्यात आले असून ग्रामपंचायतीना पाणी पुरवठा होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुवाऱबाव ग्रामपंचायतीला सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस पाणी पुरवठा झालेला नाही.
सोमवारी पाणी योजनेची साप्ताहिक सुटी, सोमवारी रिक्षा फिरवून मंगळवारी पाणी पुरवठा होणार नाही, असे सांगण्यात आले. बुधवारी पाणी पुरवठा होणार की नाही याची कल्पना देण्यात आली नाही. कूवारबाव ग्रामपंचायतीला पाण्याचा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने सलग तीन दिवस योजनेचे नळ आटले. पुढे अजून काय वाढून ठेवले माहीत नाही. या समस्येबाबत ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, आता गप्प आहेत, कुवारबाव ग्रामस्थांना गृहीत धरले जात आहे का? असे संतप्त सवाल विचारले जात आहेत.
कुवारबाव येथील तीन साठवण टाक्यामधून दररोज एकूण अडिज लाख लिटर पाण्याचा पुरवठा नळपाणी योजने मार्फत केला जातो.
www.konkantoday.com