गोरगरीब रूगांकरिता आधारवड ठरलेलेडॉ. शंतनू जोशी यांचे निधन
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी यांचे चिरंजीव व गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देवून गोरगरीब रूगांकरिता आधारवड ठरलेले डॉ. शंतनू जोशी यांचे सोमवारी सायं. ४.३० वा. पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले. यामुळे नरवणसह गुहागर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
त्यांना काही दिवसांपूर्वी ताप आल्याने उपचाराकरिता डेरवण येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. www.konkantoday.com